State Govt: राज्य सरकारची विशेष मोहीम! या कालावधीत होणार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’

Special campaign of the state government! During this period, 'National Leader to National Father Seva Fortnight' will be held.

मुंबई : सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात (Maharashtra) ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जावर कालमर्यादेत निपटारा व्हावा, लोकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी हा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ (National Leader to National Father Seva Fortnight) राबवला जाणार आहे.

Vijay Deverakonda: ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडा पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. दरम्यान त्यांना वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. म्हणून पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबपर्यंत हा सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले.

मोठी बातमी! लम्पी आजारामुळे जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना मिळणार मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासोबतच लोकांची प्रलंबित कामे या कालावधीत मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले आहेत. तर या पंधरवडय़ाच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला म्हणाले, “सरकारच्या भरवश्यावर राहू नका…”

या पंधरवडय़ात सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी. बी. टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त होतील. दरम्यान त्या नंतर प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मदत आणि पुनर्वसन, कृषी,आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *