
मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गट व समर्थकांवर टीका करणे सुरू आहे. दरम्यान शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना खोचक ऑफर देऊन डिवचले आहे.
युवा शेतकऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! गव्हाच्या पिकातून साकारली ‘शिवप्रतिमा’
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील नेते आनंद व्यक्त करत आहेत. यापार्श्वभूमीवर मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांना खास ऑफर दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ” निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्हाला न्याय मिळाला आहे. या निकालानंतर ठाकरे गटातील उर्वरित आमदार खासदार देखील आमच्याकडे येतील. यामुळे पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. त्यांनीही आता आमच्या पक्षात यावे.”
“…म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज”, काय म्हणाले उदयनराजे भोसले?
या वक्तव्याने उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने लागणार यांची आम्हाला खात्री होती. 40 आमदार, 14 खासदार व 10 अपक्ष आमदारांसह अनेक नगरसेवक आमच्या सोबत होते. आमच्याकडे जास्त संख्याबळ होते. असे देखील संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare) यावेळी म्हणाले आहेत.
“त्यांनी जनाची नाही मनाची तरी ठेवावी”; अजित पवारांनी भाजपला धारेवर धरले