
पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यालासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. दरम्यान कोयता गँगवर (Koyta Gang) कारवाई करण्यासाठी पोलीस चांगलेच दक्ष झाले आहेत.
कोयता गॅंगला पुणेकरांनी शिकवला चांगलाच धडा; दांडक्याने दिला चोप
माहितीनुसार, आता ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’ निर्माण करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.
दरम्यान कोयता गँगवर (Koyta Gang) कारवाई करण्यासाठी पोलीस मध्यंतरी चांगलेच दक्ष झाले होते. मात्र तरीदेखील मागच्या काही दिवसापूर्वी पुणे येथील अजम कॅम्पस ( Ajam Campus) परिसरात तरुणांनी कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. हा देखील प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.
“उर्फी जावेदनं जे केलंय त्यात काही चुकीचं नाही”, अमृता फडणवीसांच वक्तव्य चर्चेत