
Ravikant Tupkar । स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Sanghatana) धुसफूस सुरु आहेत. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे (NCP) स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येही फूट पडते की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याकडून रविकांत तुपकरांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याला रविकांत तुपकर यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, आज पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे या बैठकीला हजर राहणार नाहीत. त्याशिवाय ते इतर कोणत्याही पक्षात न जाता स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ते परवापासून नॉट रिचेबल असून लवकरच माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.