राजकीय हालचालींना वेग! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानाने चर्चांना उधाण

pankaja Munde

राज्यात काही दिवसांपूर्वी आपल्याला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ८ नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) प्रवेशामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. राज्यात पुन्हा एकदा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या लवकरच काँग्रेस पक्षामध्ये (Congres) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय गोटात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतीच मुंडे यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “समजा त्यांची भेट झाली असेल आणि काँग्रेसमध्ये येण्यास त्या उत्सुक असतील तर त्यांचे पक्षामध्ये स्वागत आहे.”

“मातोश्रीच्या वहिणींना दोन भाऊ एकत्र येण मान्य आहे का?” ‘या’ नेत्याचा खोचक सवाल

दरम्यान, पंकजा मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशावरून पटोले यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे भाजपसोबत आल्याने पंकजा मुंडे यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे खरच पक्ष सोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IMD Weather Updates । पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळाधार पावसाचा इशारा, जाणून घ्या इतर जिल्ह्याची परिस्थिती

हे ही पहा

Spread the love