Site icon e लोकहित | Marathi News

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा लालपरितून प्रवास करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद, चार दिवसात ‘एवढ्या’ नागरिकांनी केला प्रवास

Spontaneous response of senior citizens above 75 years to travel through Lalpar, 'so many' citizens traveled in four days

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी 25 ऑगस्ट रोजी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून (ST) मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.तसेच आपल्या ज्येष्ठ नागरिक वयाच्या पंच्चाहत्तरीत कोण एसटीने प्रवास करणार? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता.

पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते? कोणत्या गणपतीचा काय आहे विशेष? जाणून घ्या माहिती!

पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय फासला नसून याउलट या निर्णयाचे चांगले परिणाम दिसले.कारण मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून (ST) मोफत प्रवास या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले.तसेच महत्वाची अजून एक बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात अशी घोषणा केली होती की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून 50 टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल.

Ambarnath: अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याने गणेशोत्सवाचा बॅनर फाडला, गुन्हा नोंदवत कार्यकर्त्यास अटक

महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः माहिती दिली की,गेल्या चार दिवसांत म्हणजे 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातून सुमारे 1 लाख 51 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे.पुढे शेखर चन्ने म्हणाले की प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने म्हणाले.

Swapnil Joshi: मराठी अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाच धूमधडाक्यात आगमन, पाहा पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतला साधेपणा

स्मार्ट कार्डसाठी नोंदणी

34 लाख 88 हजार ज्येष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाकडे स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 14 लाख 69 हजार आहे.

Spread the love
Exit mobile version