ठाणे: राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे नेतृत्व पाहून श्रीकांत शिंदे हे युवासेनेचे अध्यक्ष होणार असे पोस्टर समर्थकांनी व्हारायल केले आहे. या आधीच श्रीकांत शिंदे यांना युवा सेनेचा अध्यक्ष करा अशी मागणी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. शिंदे गट समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आता मात्र हे मनावर घेतले आहे. सगळीकडे ही चर्चा चालू आहे.
Devendra Fadnavis: नव्या “नोंदणी व मुद्रांक” भवनाचे आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देत पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा घेतला आणि थेट गुवाहाटी गाठली होती . यानंतर त्यांनी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून भाजपसोबत जवळीक सांधून मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांनतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे देखील राज्यभरात दौरे करत आहेत. त्यांचे हे नेतृत्व पाहून श्रीकांत शिंदे यांना युवा सेनेचा अध्यक्ष करा अशी मागणी शिंदे समर्थकांकडून केली जात असून अशा पद्धतीचे पोस्टर देखील पोस्टर व्हायरल होऊ लागले आहे.
शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी; शेततळे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान
दरम्यान, सध्या राज्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दौरे करत आहेत . ते शिंदे गटाच्या आमदारावर टीकास्त्र सोडत आहेत . त्यामुळे आता आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे गट युवासेनेवर देखील दावा करणारं असल्याचं दिसून येतंय. तसेच श्रीकांत शिंदे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे पाहता आता त्यांना युवासेनेच्या अध्यक्ष केले पाहिजे या चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे आपल्या पुत्राच्या खांद्यावर युवा सेना अध्यक्षपदाची धुरा देणार का ? याकडे कार्यकर्त्यांची लक्ष लागून आहे.