Politics News । निवडणुकीपूर्वी वंचितला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षांचा पक्षाला रामराम

Politics News

Politics News । सोलापूर : संपूर्ण राज्यात लोकसभेच्या (Loksabha) निवडणुकांची जोरात तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Alliance) सर्वात मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.

Sangli Loksabha Election । मोठी बातमी! काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड (Srishail Gaikwad) यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे सोलापूर आणि माढा लोकसभेचे उमेदवार आजचं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीशैल गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देत उमेदवारीबाबत विचारात घेतले नसल्याचे खंत व्यक्त केली आहे.

Loksabha Election 2024 । शरद पवारांची मोठी खेळी! बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

“आंबेडकरी चळवळीतला मी एकमेव गद्दार नसणारा माणूस असल्याने मला अशी वागणूक मिळत आहे. मी शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीत राहील. निळा झेंडा सोडणार नाही. मी आता वंचितचं नाही तर आता आंबेडकरी चळवळीच काम करणार आहे,” असे म्हणत श्रीशैल गायकवाड यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली आहे.

Lok sabha Election । सर्वात मोठी बातमी! ..तर प्रायव्हेट कंपन्यांवर होणार कारवाई

Spread the love