
Ssc Result । महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्र बोर्डाची 10वीची परीक्षा 01 मार्च ते 27 मार्च 2024 दरम्यान झाली होती. तेव्हापासून विद्यार्थी बोर्डाच्या निकालाच्या अपडेटची वाट पाहत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Ghatkopar Hoarding Case । घाटकोपर होर्डिंग घटनेतील आरोपीला मोठा धक्का, कोर्टाने वाढवली पोलिस कोठडी
या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५. ८१ टक्के लागला आहे. यंदा कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2024 पाहता येईल.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कुठे पाहायचा?
महाराष्ट्र बोर्ड 10वी चा निकाल 2024 खाली दिलेल्या वेबसाईटवर पाहता येईल.
1- mahresult.nic.in
2- mahahsscboard.in
3- results.digilocker.gov.in
4- results.gov.in