St Bus । एसटीचा प्रवास हा कमी पैशात आणि सुरक्षितरित्या होतो त्यामुळे राज्यातील अनेक लोक एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. लांब लांबच्या ठिकाणी अनेक जण एसटीचा प्रवास करतात. मात्र एसटी मधून प्रवास करत असताना प्रवाशांना सुट्ट्या पैशांची नेहमीच अडचण भासते. कधी सुट्टे पैसे कंडक्टरकडे उपलब्ध नसतात तर कधी ग्राहकांकडे हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. त्याचबरोबर या सुट्ट्यांपेक्षांमुळे कंडक्टर आणि ग्राहक यांच्यामध्ये नेहमी वाद देखील होतात. मात्र आता ही अडचण दूर झाली आहे. (Onilne Payment In St Bus)
Amol Kolhe । खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं सर्वात मोठं आव्हान!
एसटी प्रवाशांना आता थेट मोबाईल मधून फोन पे, गुगल पे सारख्या ॲप्सचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. सध्या अनेक लोक हे डिजिटल पेमेंट करत असून भाजीपाल्यापासून ते विमानाचे तिकीट काढण्यापर्यंत यूपीआय पद्धतीचा वापर केला जातो. आता हीच सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुट्ट्या पैशांची किटकिट राहणार नाही.
Pune Koyta Gang News । पुण्यात कोयता गॅंगने पुन्हा घातला धुमाकूळ, 20 ते 25 वाहनांची केली तोडफोड
सुट्ट्या पैशांवरून नेहमीच वाद होतात हे वाद टाळण्यासाठी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. कंडक्टर जवळ असलेल्या तिकीटच्या मशीन मध्येच आता क्युआर कोड जनरेट होणार असून तुम्ही कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात.
Poco X6 5G । नवीन स्मार्टफोन सीरीजची झलक, 512GB स्टोरेजसह हे फीचर्स अपेक्षित