ST Bus Strike । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. आजपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे, ज्यामुळे एसटी सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ही पावले सरकारच्या कर्मचाऱ्यांसमान वेतन आणि विविध आर्थिक मागण्यांसाठी उचलली गेली आहेत. यासोबतच, खासगीकरणाच्या विरोधात, जुनी बस बदलून नवीन बस खरेदी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
Ajit Pawar । अजित पवारांची निवडणुकीआधी बारामतीकरांना साद; म्हणाले…
एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, आणि पगारवाढीच्या फरकाची मागणी केली आहे. 4849 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेचे वाटप, तसेच इतर विविध सुविधांच्या सुधारणेच्या मागण्याही त्यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी सरकारकडे अंतिम इशारा देत, आचारसंहितेच्या लागू होण्यापूर्वी निर्णय घेतला जावा असे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटीलांची मोठी घोषणा!
गणेशोत्सवाच्या काळात या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांनी सेंट्रल येथे निदर्शनं केली आणि सरकारला अंतिम इशारा दिला. आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Pune Crime । पुण्यात थरारक घटना! माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार