मुंबई : व्हिडिओ, रिल्स बनवून सोशल मीडियावर अनेकजण लोकप्रिय झाले आहेत. रिल्स बनवण्यासाठी कोणत्या वयोगटाची मर्यादा नाही. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी (mangal Giri) या आपल्या रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर चांगल्याच लोकप्रिय झाल्या.परंतु टिकटॉक स्टार(reels star) लेडी कंडक्टर मंगल गिरी यांना 1 ऑक्टोबर रोजी निलंबित (Suspended) करण्यात आले होते. अखेर 13 ऑक्टोबर रोजी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
चक्क घराची भिंत पाडताना सापडली तब्बल 160 हून अधिक चांदीची नाणी, पुढे झालं अस की…
मंगल गिरी यांनी डुयटीवर (on duty)असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवायच्या. त्यामुळे त्यांच्यावर बस मध्ये ऑन ड्युटी खाकी ड्रेसवरील व्हिडीओ तयार करुन एसटी महामंडळाची (ST Corporation) प्रतीमा मलीम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर मंगल गिरी यांच्या विविध स्तरातून आक्षेप घेण्यात आले.
Viral Video: जिमच्या इक्विप्मेंटवरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी
तसेच गिरी यांच्या नीलंबनावरून त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली होती. महत्वाची बाब म्हणजे एवढं होऊन सुद्धा मंगल सागर गिरी यांचे लाखो फॉलोवर्स झाले होते. त्यांच्या समर्थनार्थ अनेक वादविवादाच्या टिपण्या एसटी महामंडळातर्फे करण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर अनेक राजकीय मंडळींनी सुध्दा यावर ट्वीट करून निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे अखेर एसटी महामंडळाला त्यांचे निलंबन मागे घ्यावे लागले.
मोठी बातमी! ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी