आज 5 नोव्हेंबर यावर्षी विराट कोहली त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. आजच्या लेखामध्ये आपण विराटचा जन्म कोठे झाला? त्याने क्रिकेट खेळायला कधीपासून सुरवात केली? आणि त्याच्या परिवाराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्यायची – देवेंद्र फडणवीस
विराटचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. विराटचे वडील वकील होते तर त्याची आई एक गृहिणी होती. त्याचा वडिलांचे नाव प्रेम कोहली तर आईचे नाव सरोज कोहली. विराटला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण देखील आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, विराट हा तीन वर्षांचा असल्यापासून त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.
मोठी बातमी! कापुस-सोयाबीन भावासाठी राजू शेट्टी उभारणार आंदोलन
विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये विराट कोहलीने त्याचे शालेय शिक्षण घेतले. तो उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला. विराट फक्त खेळातच नाही तर तो अभ्यासात देखील हुशार होता. पहिल्यांदा कोहली ऑक्टोबर २००२ मध्ये पार पडलेल्या २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांखालील दिल्लीच्या संघातून खेळला होता. या स्पर्धेमध्ये ३४.४० च्या सरासरीने त्याने सर्वांत जास्त १७२ धावा केल्या. यावेळी पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.
Salman Khan: “देव मुंबई पोलिसांचे भले करो”! सलमान खानचे ट्विट चर्चेत
विराट कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्यांचे निधन मेंदूच्या झटक्यामुळे झाले होते. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो की, “मी माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी पहिल्या आहेत. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. विराटने सांगितले की, लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता, “माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही देखील मला कधी कधी त्यांच्या सहवासाची आठवण होते.” असं विराट कायम म्हणत असतो.
“टिकल्या लावलेल्या मुलींकडे मुलं बघत नाहीत…”, मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत