रखडलेल्या सरकारी भरत्यांमुळे आजचे तरुण चिंतेत आहेत. अशातच आता रखडलेली पोलीस शिपाई भरती मार्गी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच याची जाहिरात (Advertisement) प्रसिद्ध झाली होती. यासाठी अर्ज करण्याची तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी (Ground Test) सुरू होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! आता न्यायालयच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची हकालपट्टी करणार?
अगामी पोलिस शिपाई व चालक पदाच्या भरतीसाठी राज्य शासनाकडून 17 हजार 130 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंबंधीत नवीन माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी होऊन लवकरच अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. ही मैदानी चाचणी एकूण 59 गुणांची असणार आहे. यातून यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. यामध्ये प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
महत्वाची बातमी! बारामतीतून वैदयकीय कॉलेज महिला रुग्णालयासाठी बससेवा सुरु
मागासवर्गीय उमेदवारांना या भरतीसाठी कर्ज करताना नॉन क्रिमिलिअर सादर करण्याची अट देण्यात आली होती. परंतु, यामध्ये गृह विभागाने 1 एप्रिल 2021 ते 21 मार्च 2022 या काळातील मूळ प्रत असावी असे सांगितले होते. ही मुदत संपून गेल्याने उमेदवार संभ्रमित झाले होते. यावर उपाय म्हणून सध्या काढलेले नॉन क्रिमिलियर (Non crimiliar for Police recruitment) चालणार असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
पापा च्या परीने दिली तरुणाच्या बाईकला धडक; परंतु, माफी न मागताच….