सध्या शेतकरी (Farmers) पारंपरिक पिकांपेक्षा व्यापारी दृष्टिकोनातून विविध आधुनिक पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. यामध्ये अनेक शेतकरी विविध प्रकारचे विदेशी फळे (Exotic fruits) व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जर तुम्ही ड्रॅगन फ्रुटचा (dragon fruit) विचार केला तर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) शेतकरी ड्रॅगन फ्रुटची शेती (agriculture) करू लागले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारने ड्रॅगन फ्रुट शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Rashmika Mandana: रश्मीकाने तिच्या चाहत्याची केली ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एका हेक्टरवर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी राज्य सरकारकडून चार लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांना ही रक्कम 40 टक्के म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे.
Chagan Bhujbal: “शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे?” छगन भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चाना उधाण
पहिल्या टप्प्यात 60 टक्के म्हणजेच 96 हजार रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना हे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या अनुदानासाठी राज्य सरकारने चार कोटी रुपयांची तरतूद केली असून महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात देखील केली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण! जास्तीत जास्त पैसा मिळवायचाय तर ‘या’ कोंबडीचे करा पालन
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1) शेतकऱ्यांच्या नावावर 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक
2)सदर शेतकऱ्याकडे पासपोर्ट फोटो
3) सातबारा तसेच 8अ चा उतारा
4) आधार लिंक असलेले बँक खाते,
5) जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
Navneet Rana: नवनीत राणांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO