नुकतेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी १२ हजार रुपये जमा होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना १ रुपयात पिक विमा मिळणार आहे. मात्र या योजनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना आहे, अशी टीका केली.
क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधून ‘हा’ खेळाडू बाहेर
नाना पटोले म्हणाले, राज्य सरकार घोषणा, इव्हेंट्स आणि जाहिरातबाजी यापलीकडे काही करत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठका असो किंवा राजकीय सभा सगळीकडे घोषणाबाजी केली जात आहे. शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे केवळ घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना ही देखील त्यापैकी एक आहे. ही योजना म्हणजे नमो फसवी योजना आहे. राज्य सरकार आम्ही शेतकऱ्यांच्या अनुदानात १२ हजार रुपये वाढ करत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांनी म्हटले.
स्मार्टफोन घेताय तर थांबा! ‘असा’ स्मार्टफोन घेतल्यानंतर तुम्हालाही भोगावा लागेल 3 वर्षांचा तुरुंगवास
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उध्वस्त झाला आहे. यावर राज्य सरकारकडून फक्त घोषणा करण्यात आल्या. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. राज्य सरकारच्या घोषणा या केवळ प्रसिद्धीसाठीच आहेत. मात्र त्यांनी केलेल्या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी म्हटले.