महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षेदरम्यान राज्यातील एका केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी करण्यासाठी उमेदवाराने चक्क ब्लुटूथच जवळ बाळगले होते. यामुळे या उमेदवाराविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसेवा मुख्यपरिक्षा 2022 च्या औरंगाबाद केंद्रावर ( Aurangabad Centre) हा प्रकार घडला आहे.
तिने ब्रेक ऐवजी अँक्सिलेटर दाबला आणि पुढची घटना वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
एमपीएससी कडून नुकतीच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 घेण्यात आली. राज्यातील सहा विविध केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद केंद्रावर सचिन नवनाथ बागलाने या उमेदवाराने ब्लुटूथ जवळ बाळगल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
VIDEO: नाणेफेक दरम्यान रोहित शर्माने केली ‘ही’ मोठी घोडचूक
दरम्यान विविध तंत्रज्ञानांचा वापर करून परीक्षांमध्ये गैरप्रकार होण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. मात्र अशा घटनांमध्ये उमेदवारांवर गुन्हा दाखल होतोच मात्र आयोगाकडून प्रतिरोधीत देखील करण्यात येते. यामुळे उमेदवारांनी देखील भविष्याचा विचार करून प्रामाणिकपणे परीक्षा देणे गरजेचे आहे.