सध्या बऱ्याच ठिकाणी रस्ते दुरुस्ती करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या बारामती भिगवण या रोडचे काम चालू आहे. या रोडचे काम चालू असल्यामुळे रुई सावळ म्हसोबाचीवाडी निरगुडे व सिनारमास या रोडवर खूपच वाहतूक वाढली आहे.
वाहतूक वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र हे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून श्री संदीप मारुती चांदगुडे (उपाध्यक्ष इंदापुर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस) यांनी बांधकाम विभाग बारामती यांना एक पात्र लिहिले आहे.
भीषण अपघात! इनोव्हा गाडीची रस्ता दुभाजक ओलांडून ब्रेझाला धडक, १ जागीच ठार तर ४ गंभीर जखमी
यामध्ये त्यांनी रुई सावळ ते सिवारमास रोडची साईड पट्टी भरणे बाबत, खड्डे भरणे व झाडे झुडपे काढणे याबाबत विनंती केली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना देखील सुरळीत वाहतूक करता येईल.