मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात अदानींमुळे चांगलीच मरगळ आली आहे. मोठे मोठे गुंतवणूकदार व कंपन्या नुकसान सहन करत आहेत. अशातच आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प जाहीर झाला. आज अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजार ( Share Market) पुन्हा एकदा तेजीत आला आहे.
हिरेही झाले स्वस्त पण सोने चांदी महागले! यंदाचा अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर करायला सुरुवात करताच, शेअर बाजारात सकारात्मक चित्र तयार झाले. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेस अर्थसंकल्पामुळे 69 हजाराच्या पुढे गेला आहे.
मागच्या दहा वर्षात अर्थसंकल्प सादर करताना शेअर बाजारात खूप कमी वेळा असे चित्र तयार झाले होते. दरम्यान फक्त दोन अर्थसंकल्पावेळी सेन्सेस आणि निफ्टीमध्ये ( Raise in senses & Nifty) दोन टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ पहायला मिळाली.
पॅनकार्ड संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
दरम्यान आज सकाळी निर्मला सीतारामन यांनी भाषणास सुरुवात करताच 10 मिनिटांत 600 अंकांनी सेन्सेसची उसळी पहायला मिळाली. तसेच सर्वच सेक्टरच्या शेअर बाजारात आज हिरवा रंग दिसत आहे. सेन्सेसप्रमाणे स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्ये 138 अंकांची वाढ पहायला मिळाली आहे.
सिगारेटही महागली, यंदाच्या बजेटमध्ये ‘या’ गोष्टी महागल्या; वाचा सविस्तर
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिगारेट ( Sigarate) वरील टॅक्स 16 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली. ही घोषणा होताच सिगारेट कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. यामध्ये बीएसईवर गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड (Godfrey Phillips India Limited) आणि आयटीसी लिमिटेड (ITC Share Limited) सह अन्य सिगारेट कंपन्यांचा समावेश आहे.
अबब! तब्बल 12 कोटींचा रेडा; जगातील सर्वात मोठ्या रेड्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?