भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. आज देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो. या निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान रामनवमीनिमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे
कोरोनाचा कहर! भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ
देशातील शेअर बाजारातील व्यवहार आज दिवसभर बंद राहणार आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज कोणताही व्यवहार होणार नाही. 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
मोठी बातमी! छत्रपती संभाजी नगरमध्ये राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ
दरम्यान, जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि परदेशी निधीचा ओघ वाढल्याने बुधवारी स्थानिक शेअर बाजारात तेजीचे वातावरण असताना बुधवारी सेन्सेक्स ३४६ अंकांनी आणि निफ्टी १२९ अंकांच्या वाढीसह बंद झाला. व्यापार्यांच्या म्हणण्यानुसार, मासिक फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंटच्या शेवटच्या दिवशी सेवा, रियल्टी, कमोडिटी आणि वाहन समभागांमध्ये खरेदीमुळे बाजारात सकारात्मक भावना वाढली.
धक्कादायक घटना! वडिलांनी अभ्यास करायला सांगितला अन् ९ वर्षीय मुलीने थेट आत्महत्या केली