सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांचीच जीवनशैली बदलली आहे. या जीवनशैलीमध्ये (lifestyle) पीसीओएस, फुशारकी, पोटाची चरबी, उच्च रक्तदाब आणि मायग्रेन, मळमळ, डोकेदुखी किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (जीईआरडी), हाय कोलेस्ट्रॉल सारख्या आजाराने (illness) प्रत्येकजण त्रस्त आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्या शरीरावर(Boady) परिणाम होऊ शकतो. या सर्व समस्या होण्यास वेगवेगळी कारण आहेत. त्यामुळे उपचार (Treatment) देखील आहेत. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते या समस्यांना तोंड देण्यासाठी चहा किंवा कॉफीऐवजी हर्बल चहाने दिवसाची सुरुवात करावी.
Eknath Shinde: पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेवर एकनाथ शिंदेनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…
सकाळी कॅफिनचे सेवन केल्याने सूजलेल्या आतड्यात जास्त जळजळ होते. तसेच जेव्हा तुम्ही आतडे आणि हार्मोनल समस्यांमुळे त्रस्त असता. त्यापासून आराम मिळवायचा असेल तर सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी हर्बल ड्रिंक्सचे सेवन करावे. हर्बल पेय विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींपासून बनवले जातात. यामुळेच याच्या सेवनाने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात.
हर्बल ड्रिंक साठी या गोष्टी आवश्यक
1 ग्लास पाणी (300 मिली) घ्या,15 कढीपत्ता घ्या,15 पुदिन्याची पाने,1 टीस्पून बडीशेप, 2 चमचे धणे दाणे. हर्बल पेय तयार करण्यासाठी, चहा बनवण्याच्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि ते उकळवा. यानंतर त्यामध्ये या सर्व गोष्टी टाका आणि मध्यम गॅसवर 5 ते 7 मिनिटे उकळा. यानंतर तुमचे हर्बल ड्रिंक तयार होईल. हर्बल ड्रिंक्स व्यतिरिक्त, जर तुम्हाला ते लगेच थांबवायचे असेल तर तुम्ही तुमच्या चहा किंवा कॉफीमध्ये अर्धा चमचा तूप किंवा 1 चमचे खोबरेल तेल घालू शकता. यामुळे तुमच्या आतड्याला होणारे नुकसान कमी होऊ शकते. तसेच हार्मोनल आणि पित्तविषयक समस्या असल्यास, कॅफिन टाळणे हा उत्तम उपाय आहे.
Gopichand Padalkar: “आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” पडळकरांची जहरी टीका