Instagram Data Tracking । मोठ्या प्रमाणात दररोज इंटरनेटचा वापर केला जातो. आपण इंटरनेटवर (Internet) काय सर्च करतो, असे प्रत्येकाला वाटत असते. अनेक यूजर्स इंस्टाग्राम (Instagram) वापरतात. इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही आता पैसेदेखील कमावू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का? इंस्टाग्राम तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असते. ते तुमच्या दुसऱ्या अॅप्सवरही लक्ष ठेवते. (Instagram Users)
समजा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर इंस्टाग्राम, फेसबुक (Facebook) अशा सर्वच ठिकाणी तुम्ही सर्च केलेल्या वस्तूबद्दल जाहिरात दाखवत असते. यूजर्सना इन्स्टाग्राम इन्स्टॉल करतानाच अग्रीमेंटमध्ये परवानगी मागते. पण अनेकठिकाणी यूजर्स काहीही न वाचता परवानगी देते. (Instagram Tracking) पण तुम्ही आता हे ट्रॅकिंग फीचर (Instagram Tracking Feature) थांबवू शकता. (Tracking in Instagram)
Sharad Pawar । शरद पवार यांची मोठी खेळी; अजित पवार यांना धक्का बसणार?
अशी बदला सेटिंग
- इन्स्टाग्राम चालू करून स्क्रीनवर सगळ्यात खाली उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या आपल्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
- यानंतर प्रोफाईलवर वरती उजव्या कोपऱ्यात दिसत असणाऱ्या तीन रेषांवर टॅप करा.
- यानंतर अकाउंट्स सेंटर या पर्यायावर क्लिक करून Your Information and Permission या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे Your Acactivity off Meta Technologies या पर्यायावर क्लिक करा.
- आता Manage Future Activity या पर्यायावर क्लिक करा.
- सगळ्यात शेवटी Connect Future Activity आणि Disconnect Future Activity हे दोन पर्याय मिळतील. यातील डिस्कनेक्ट पर्याय निवडून तुम्हाला इन्स्टाग्राम ट्रॅकिंग बंद करता येईल.
Bjp । लोकसभेआधी मोठा राजकीय भूकंप! भाजपच्या बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा
असा करा पूर्वीचा डेटा डिलीट
- इन्स्टाग्रामने ट्रॅक केलेला डेटा तुम्हाला डिलीट करता येईल.
- तुम्हाला Your Activity Off Meta Technologies या मेन्यूपर्यंत जावं लागलं.
- तुम्हाला तुमची रीसेंट अॅक्टिव्हिटी पाहायला मिळेल. तुम्ही इंटरनेटवर काय सर्च केलं होतं, किंवा याआधी कोणतं अॅप उघडलं होतं हे तुम्हाला दिसेल.
- तुम्हाला आधी सर्च केलेली अॅक्टिव्हिटी डिलीट करता येईल. यासाठी Clear Previous Activity यावर टॅप करा.
- तुम्हाला फेसबुक आणि इन्स्टाग्रामची अॅक्टिव्हिटी डिलीट करता येईल.