काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची ( Bharat Jodo Yatra) संपूर्ण देशात चर्चा होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आता हरियाणा मधून दिल्ली मध्ये प्रवेश करत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी वयोवृध्द लोकांच्यात मिसळण्यापासून ते लहान मुलांशी गप्पा मारण्यापर्यंत विविध गोष्टी केल्या आहेत. संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कुठलाही बडेजावपणा न ठेवता सामान्य लोकांच्यात वावरत होते. इतकच नाही तर या यात्रेत त्यांनी आपला वेश देखील अगदी साधाच ठेवला होता. या यात्रेत राहुल गांधी ( Rahul Gandhi) लोकांना फक्त पांढऱ्या टी-शर्ट मध्ये दिसले. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
महत्वाची बातमी! कृषी ड्रोनसाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
हरियाणाचे कृषिमंत्री जेपी दलाल ( JP Dalal) यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील टी-शर्ट वरून टीका केली असून, यामध्ये ते “राहुल गांधी यांनी देशाच्या हितासाठी आर्मीला सांगावे की, ते कोणतं औषध घेत आहेत. कारण, खुप थंडी असूनसुद्धा ते फक्त टीशर्ट घालत आहेत. याचा देशाला फायदा होईल.” असे म्हणाले आहेत.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोचर दांम्पत्याला सीबीआय कडून अटक
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी असे पत्र देखील हरियाणा सरकारकडून ( Hariyana Government) राहुल गांधी यांना देण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता भारतात देखील वेळीच उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. यामुळे हरियाणा सरकारकडून भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या संदर्भाने पत्र देण्यात आले आहे.
दाक्षिणात्य व बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुलना केली जाऊ नये; ‘केजीएफ’ स्टार यशचे मोठे वक्तव्य