कारमध्ये सीटबेल्ट नसल्यास होणार कडक कारवाई; पोलिसांकडून निवेदन जाहीर

Strict action will be taken if there is no seat belt in the car; Statement released by the police

मुंबई : आता मुंबईतील रस्त्यांवर चार चाकी वाहनांमधून (four-wheeler) प्रवास करताना नियमांचे पालन करावे लागणार आहे. आता मुंबई चारचाकी वाहनाच्या चालकासह सहप्रवाशांनादेखील सीटबेल्ट (sitbelt) लावावा लागणार आहे. जर सीटबेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांच्यावर आता कडक कारवाई (Strict action) होणार आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून (mumbai police) याबाबतचं निवेदन जाहीर करण्यात आलं आहे.

23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर किशोरवयीन मुलाचा दोन दिवस बलात्कार

नेमक निवेदनात काय म्हटलय ?

मुंबई पोलिसांनी निवदेनात (statement) म्हटलं आहे की, आता मोटर कार चालवणाऱ्या सर्व ड्रायव्हर्ससह प्रवाशांनादेखील सीटबेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच मोटर व्हेईकल सुधारणा कायदा, २०१९ च्या १९४ ब (१) नुसार, आता मोटरकार चालक आणि प्रवाशी विना सीटबेल्ट शिक्षेत पात्र होऊ शकतात. इतकंच नाही तर ज्या मोटरकार वाहनांमध्ये प्रवाशांसाठी सीटबेल्टची सुविधा नाही. त्या मोटरकार वाहनधारकाने १ नोव्हेंबरपर्यंत हे सीटबेल्ट बसवून घ्यावेत.

“मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार..”, टाईमपास’फेम दगडूचे भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत वक्तव्य

सीटबेल्ट न लावल्यानं सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू

महिन्याभरापूर्वी टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला होता. दरम्यान तपासात या अपघातावेळी मिस्त्री यांनी सीट बेल्ट न लावल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे याच यापार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे भारतीय वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज आणि चालकासह सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक असल्याची घोषणा केली होती.

Abdu Rozic: सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान देखील आहेत त्याचे फॅन ‘तो’ अब्दू रोझिक नक्की आहे तरी कोण?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *