Rain in Maharashtra । पुणे : मागील काही दिवसांपासून राज्याकडे पावसाने (Maharashtra Rain) पाठ फिरवली आहे. पावसाला पोषक अशी स्थिती तयार झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. भर पावसाळ्यात पाऊसच गायब झाल्याने शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Rain Update) शेतकऱ्यांना पिके कशी जगवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल. (Havaman Andaj)
अशातच आता राज्यातील पावसासंदर्भात पुणे हवामान खात्याकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. (IMD Weather Forecast) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडरा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Load Shedding । राज्यात पुन्हा लोडशेडिंग! दररोज ‘इतके’ तास गायब होणार वीज
पुणे, मुंबईत पावसाला सुरुवात
आजपासून पुणे आणि मुंबईमध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमधील खोपोलीमध्ये शुक्रवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच रत्नागिरीमध्येदेखील पावसाला सुरुवात झाली आहे. महिनाभर पाऊस गायब झाल्याने शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली होती. परंतु पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (Heavy Rain)
Jalna lathi charge । लाठीचार्जने वातावरण तापलं! मराठा आंदोलक घेणार मोठा निर्णय
९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज
दरम्यान, सप्टेंबर महिन्यामध्ये ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावली तर शेतकऱ्यांवरचे संकट टळू शकते. जर या महिन्यात चांगला पाऊस झाला तर रब्बी हंगाम शेतकऱ्यांना घेता येईल.
Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! आज शरद पवार जालन्यातील जखमी आंदोलकांची घेणार भेट