बारामतीमध्ये ‘कृषीक 2023’ची जोरदार तयारी! 170 एकर परिसर होणार कृषिमय

Strong preparations for 'Agriculture 2023' in Baramati! 170 acres area will be agricultural

बारामती मधील कृषीक प्रदर्शन ( Krushik 2023) अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्यातील शेतकरी, व्यवसायिक व विद्यार्थी या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत असतात. हे कृषी प्रदर्शन उद्यापासून सुरू होणार आहे. येत्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे.

निवडणूक आयोग त्यांच्या घरचा आहे का? सुषमा अंधारे शिंदे गटावर आक्रमक

अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र बारामती अटल इंक्यूबेशन सेंटर मार्फत हे कृषी प्रदर्शन ( KVK) आयोजित केले जाते. जवळ जवळ 170 एकर क्षेत्रावर हे प्रदर्शन भरणार असून याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

प्रदर्शनामध्ये होणारी शेतकऱ्यांची गर्दी, पार्किंग व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी भोजन, चहा नाश्ता तसेच लांबून येणा-या शेतकऱ्यांच्या निवासाची सोय याबाबत नुकताच आढावा घेण्यात आला आहे. यासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्रदादा पवार ( Rajendradada Pawar) व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे हे उपस्थित होते.

सामनाच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांसह शिंदे-फडणवीस सरकारचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

कृषीक 2023 मध्ये 153 जातीच्या भाजीपाल्याची 52 पिके, शेतातील 54 नाविन्यपूर्ण स्टार्टअप, फुल शेतीची 27 पिकांचे 112 वान, स्मार्ट मशीनरीचे 108 प्रकार, १४ प्रकारचे खतांचे डेमो दाखवले जाणार आहेत. तसेच प्रत्येक प्लॉटवर माहिती देण्यासाठी बोर्ड व एक व्यक्ती असणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

एन एफ टी तंत्रज्ञान, आय ओ टी रोबोट सेन्सर आधारित स्मार्ट सिंचन, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञाची ४५ प्रात्यक्षिके, 47 जातींची फळे, 33 फळ पिकांची रोपे, विविध शेतीविषयक प्रात्यक्षिके अशा अनेक गोष्टींसह 210 कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी लागणार आहेत.

निवडणूक आयोग त्यांच्या घरचा आहे का? सुषमा अंधारे शिंदे गटावर आक्रमक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *