आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण मानसिक ताण-तणावाला सामोरे जात आहे. यामुळे काही लोक तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलत आहेत. धुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने असेच टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या ( Sucide) केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना विद्याभवन वसतीगृहात घडली आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; १५ जण गंभीर जखमी
मूळच्या साक्रीमधील दातर्ती गावातील असणाऱ्या या मुलीने काल (दि.11) दुपारी आत्महत्या केली. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. भारती अमृत चौरे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. भारतीने दोन महिन्यांपूर्वीच महिला वसतीगृहात ( Hostel) प्रवेश घेतला होता. पर्वापासून ती रूमवर एकटीच होती. तिची मैत्रीण देखील गावाला गेली होती.
बारामतीमधल्या शेतकऱ्याची कमाल! आल्याच्या शेतीतून कमावले लाखो रुपये…
हीच संधी साधून भारतीने रूमधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास एक मैत्रीण भारतीच्या रूमवर गेली असता हा प्रकार लक्षात आला. दरम्यान तपास करत असताना भारतीच्या रूममध्ये एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये ‘आई पप्पा सॉरी’ असे म्हंटले होते. यामध्ये तिने आपण तणावात असल्याची माहिती दिली होती. या घटनेमुळे वसतीगृहात भीतीचे वातावरण पसरले आहे.
“मी नवऱ्याला सोडेल, पण आयुष्यात ‘या’ व्यक्तीला कधीच सोडणार नाही”; गौतमीने केला मोठा खुलासा