शिक्षण (Education) घेत असताना विद्यार्थ्यांना (Students) अनेक संकटांचा सामना करावा लागतो. विद्यर्थ्यांसमोर शिक्षण घेत असताना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैशाचा असतो. काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना खूप अडचणी येतात. काही विद्यार्थी या अडचणींचा सामना करतात तर काही विद्यार्थी खचून जाऊन टोकाचं पाऊल उचलतात. (latest marathi news)
सध्या मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (A shocking incident has come to light from Madhya Pradesh.) जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मध्यप्रदेशात श्योपुर येथे उच्च शिक्षण घेण्याकरिता पैसे नसल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ; निम्म्याच्या वर खुर्च्या रिकाम्याच
मध्यप्रदेशमधील या तरुणाने चक्क तोंडामध्ये सुतळी बॉम्ब फोडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली असून तो बीएससीचं शिक्षण घेत होता. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव ब्रजेश प्रजापती (Brajesh Prajapati) असं सांगितले जात आहे. तो मध्यप्रदेशातील श्योपूर या ठिकाणचा रहिवासी आहे.
मांजर आडवी गेली तर…जाणून घ्या खरे सत्य! माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क
अधिकची माहिती अशी की, ब्रजेश सकाळी ९ च्या सुमारास शौचालयात गेला आणि तेथे त्यांनी स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून आत्महत्या केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ब्रिजेश हा अभ्यासामध्ये खूप हुशार होता. त्याच्या जाण्याने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विराट-अनुष्काला चाहत्यांकडून धक्काबुक्की! व्हिडीओ होतोय व्हायरल