दहावी व बारावीच्या गुणांवरून करिअरची दिशा ठरत असते. म्हणून या परीक्षांना प्रचंड महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( SSC) व उच्च माध्यमिक शिक्षण ( HSC) मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावाची परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. फेब्रुवारी व मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अजित पवारांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना पायउतार करणाऱ्यांचा बदला…”
चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 ची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर अनुचित व गैरप्रकार घडू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेवेळी होणाऱ्या कॉपी (Copy) प्रकरणाला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे.
मोठी बातमी! शिंदे सरकार टिकणार की कोसळणार? सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, मागील वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये खूप गोंधळ पहायला मिळाले. यावेळी बऱ्याचशा परीक्षा केंद्रावर विषय शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित बैठकव्यवस्था करण्यात आली न्हवती. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चार सदस्यांचे बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसून राहणार आहे. तसेच कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची असणार आहे.
दुःखद! ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांनी घेतला अखेरचा श्वास