Site icon e लोकहित | Marathi News

विद्यार्थ्यांना उद्या मिळणार बारावी परीक्षेचे हॉलतिकीट

Students will get hall ticket for 12th exam tomorrow

दहावी व बारावीच्या गुणांवरून करिअरची दिशा ठरत असते. म्हणून या परीक्षांना प्रचंड महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( SSC) व उच्च माध्यमिक शिक्षण ( HSC) मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावाची परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.

पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

आता बारावीच्‍या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) उद्या उपलब्‍ध होणार आहे. विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे प्रवेशपत्र ] उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 ची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे.

रँगिगला कंटाळून ITI च्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

दरम्यान, परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर अनुचित व गैरप्रकार घडू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षाकेंद्रावर ( Exam Centre) बैठे पथक पूर्णवेळ थांबणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लागली १ कोटींची लॉटरी; गावाने काढली जंगी मिरवणूक

Spread the love
Exit mobile version