Menstrual cycle । मोठी बातमी! मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी, ‘या’ विद्यापीठाचा निर्णय

Students will get leave during menstruation, the decision of 'Ya' University

Menstrual cycle । मासिक पाळीच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीला असह्य वेदना आणि रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागते. त्याचा स्त्रीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी (Holiday) मिळणार आहे. मध्य प्रदेशमधील (MP) विधी विद्यापीठाने (Law Universities) हा महत्त्वाचा घेतला आहे. हा निर्णय घेणारं हे देशातलं पहिलं विद्यापीठ आहे. (Latest Marathi News)

Taarak Mehta । चाहत्यांना मोठा धक्का! जेठालालची मालिकेतून होणार एक्झिट, स्वतःच दिली माहिती

विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करून मध्यप्रदेशातील जबलपूरच्या धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनव्हर्सिटीने हा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रापासून या विद्यापीठाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. “अनेक दिवसांपासून स्टुडंट बार असोसिएशनच्या वतीने विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या सुट्या देण्याची मागणी केली जात होती. त्याचा विचार करून आम्ही डीन स्टुडंट वेलफेअर मार्फत या सेमिस्टरपासून रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. शैलेश एन हादली यांनी दिली आहे.

Shivsena । बिग ब्रेकिंग! राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

दरम्यान, स्पेन देशाच्या संसदेकडून काही महिन्यांपूर्वी मासिक पाळीदरम्यान रजेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत असणाऱ्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा देण्याच्या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती. महत्त्वाचे म्हणजे असा कायदा करणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे.

Dasara Melava । शिंदे की ठाकरे गट? यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार, दोन्ही गटाकडून अर्ज दाखल

Spread the love