Ajit Pawar : विद्यार्थ्यांना मिळणार ३० लाखांपर्यंत कर्ज – अजित पवार

Students will get loans up to 30 lakhs - Ajit Pawar

पुणे : देशभरात महागाई प्रचंड वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. याचा आढावा घेऊन आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक बोर्डानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बोर्डानं शैक्षणिक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाचा विद्यर्थ्यांना फायदा होणार आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले, वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संचालक बोर्डाने शैक्षणिक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधी देशांतर्गत शिक्षण घेताना १५ लाख रुपये कर्ज मिळत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांना ३० लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी ४० लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *