
काही विद्यार्थ्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध असून देखील त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही. मात्र काही मूल अशी देखील आहेत की, बिकट परिस्थीवर मात करून मोठे अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर झाले आहेत. बऱ्याच तरुणांची शिकण्याची परिस्थिती नसते मात्र तरीदेखील ते परिस्थितीवर मात करून अभ्यास करतात आणि यशाचं उंच शिखर घाटतात. सध्या देखील एका तरुणीने आपल्या परिस्थितीवर मात करत NEET परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळवले आहेत. त्यामुळे तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कंधारवाडी गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. नुकताच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आणि शेतकऱ्याच्या मुलीने या परीक्षेमध्ये 720 पैकी 563 गुण मिळवले आहेत. ज्योती कंधारे (Jyoti Kandare) असं या मुलीचे नाव आहे. ही मुलगी अत्यंत गरीब घरातील आहे. तिने शेतातील कामे करून अभ्यास केला आणि चांगले मार्क मिळवले आहेत.
ज्योतीच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला महागडे क्लास लावणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने Youtube वर पाहून अभ्यास केला. ती सकाळी रानातील कामे देखील करत होती. रानातील काम करून जो वेळ मिळेल त्याचा ती अभ्यासासाठी वापर करायची. तिच्या या मेहनतीचे फळ तिला मिळाले. तिने NEET परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळवले आहेत. त्यामुळे सगळीकडे तिचे कौतुक होत आहे. माहितीनुसार, ज्योतीला स्त्रीरोज तज्ञ डॉक्टर व्हायचे आहे.
‘…म्हणून सुप्रिया मला अमिताभ बच्चन म्हणाली’, अखेर अजित पवार बोललेच