अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) कमालीचा व्यग्र आहे. टीव्ही शो आणि अनेक सिनेमाची शूटिंग, अभिनय, दिग्दर्शन सगळ्या पातळ्यांवर सध्या तै कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातं होतं. त्यावरून त्यांना ट्रोल केले गेले. दरम्यान, पुन्हा एकदा सुबोध भावे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. सुबोध भावे सोशल मीडियावर सक्रिय असतात.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या कुटूंबियांना जीवे
सुबोध भावे स्वतः करत असलेल्या प्रत्येक प्रोजेक्ट्सबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती देत असतात. ‘हर हर महादेव’ या सिनेमात त्यांनी सांगितलेल्या भूमिकेला प्रचंड विरोध करण्यात आला होता. तेव्हा सुबोध भावे म्हणाले की, बापजन्मात कुठल्या बायोपीकमध्ये काम करणार नाही. त्यानंतर ते काम करतील असं कोणालाच वाटत नव्हत. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. यादरम्यान, नुकतीच सुबोध भावे यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुक; मनसेचा भाजपला पाठिंबा जाहीर
यावेळी पोस्ट करताना सुबोध भावे यांनी लिहिले की, लहानपणापासून ज्यांच्या गोष्टी ऐकल्या, ज्यांच्या हुशारीवर प्रेम केलं त्या ‘बिरबल’ची व्यक्तिरेखा या आगामी वेब सिरीयलमध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय. लवकरच ही वेब सिरीयल तुम्हाला Zee 5 वर पाहता येईल. त्यांच्या या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक करत आहेत. तसेच आता त्यांची ही वेब सिरीयल कधी येणार याची आतुरता लागली आहे.
भारतीय खेळाडू फीट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात? निवड समितीच्या