मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता म्हणून सुबोध भावे (Subodh Bhave) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आता नुकतंच सुबोधने पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. व त्याने याबाबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
Akal Takht: यापुढे असे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही; पंजाबमधील अकाल तख्तचा इशारा
सुबोध भावेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने पुणे मेट्रो आणि त्याचे काम पाहतानाचे काही फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, मी पहिल्यांदा पुणे ते मुंबई जेव्हा एक्स्प्रेस हायवेनी प्रवास केला तेव्हा मी त्याला नमस्कार करून प्रवासाला सुरवात केली. तो नमस्कार ज्या ज्या व्यक्तींचा तो रस्ता उभारण्यात सहभाग होता त्या सर्व व्यक्तींविषयी कृतज्ञता होती.
आज पुणे मेट्रो च काम पाहताना पुन्हा एकदा हीच भावना मनात आली. अत्यंत गुंतागुंतीच्या भागातून ही मेट्रो प्रवास करणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून सक्षम करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. चित्रपट पूर्ण होऊन तो पाहताना जेव्हा रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान येतं तेव्हा ती भावना चित्रपटाशी निगडित सर्व व्यक्तींच्या कामाची पावती असते.
काही काळाने जेव्हा पुणे मेट्रो पूर्ण होईल आणि सर्व मार्ग सुरू होतील तेव्हा यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद “पुणे मेट्रो ” शी निगडित सर्वांच्या कष्टाला दिलेली कौतुकाची पावती असेल. “पुणे मेट्रो” शी संबंधित सर्व घटक- केंद्र सरकार,राज्य सरकार ,पुणे महानगरपालिका, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या हजारो व्यक्ती सर्वांप्रती फक्त कृतज्ञता आणि तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.
आपल्या मेट्रो मधून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनी ,ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक अपंग व्यक्ती यांची आपण विशेष काळजी घ्याल ही अपेक्षा…जय हिंद, जय महाराष्ट्र”, असे सुबोध भावेने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Aamir Khan: आमीर खानने तो माफीचा व्हिडिओ केला डिलीट, सोशल मीडियातून संताप व्यक्त