Suchana Seth Goa Child Murder । हल्ली देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालेल आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान बनले आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. एका CEO असणाऱ्या महिलेने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलाचा अतिशय निर्दयपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या बेंगळुरु येथील एका कंपनीची सीईओ सूचना सेठ सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
Shah Rukhkhan । शाहरुख खानने कुटुंबाच्या सर्वात वाईट काळाबद्दल केले मोठे वक्तव्य!
बेंगळुरू (Bangalore) येथील एका टेक कंपनीच्या सीईओ महिलेने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलाचा सिकेरी, कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये खून केला. त्याचा मृतदेह बॅगेत भरुन ती चालली असता तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर महिला राहत असणाऱ्या रुममध्ये रक्ताचे डाग रुमबॉयला सापडले होते. त्याने तातडीने हॉटेलमधील वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. (Goa Crime) सध्या महिला पोलिसांच्या ताब्यात असून आता प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ जेव्हा गोव्याहून बेंगळुरु येथे पळून जात होती. तेव्हा एका अपघातामुळं तिची कॅब चोरला घाटात चार तासांपर्यंत अडकून पडली होती. त्यामुळे पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला जर ही घटना घडली नसती तर मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असती आणि पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला नसता.