“Shoot चालू असतानाच अचानक…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने रुग्णालयामधून केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

"Suddenly while the shoot was going on...", the post by the Marathmola actress from the hospital is in discussion

पछाडलेला हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला आहे. या चित्रपटातील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा या पात्राला खूप पसंती मिळाली होती. दरम्यान मनीषा हिची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने या साकारली होती. आता सध्या अश्विनी कुलकर्णीने (Ashwini Kulkarni) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

धनुष्यबाण व शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!

अश्विनी कुलकर्णीची पोस्ट –

गेले काही दिवस पुण्या जवळ चाकण येथे एका चित्रपटासाठी शूट करत होते. गेले कित्येक महिने एक “दुखणं” चालू होतं. ज्याचे औषध उपचार सुरू होते च.. Shoot चालू असतानाच त्रास वाढला. 2आणि 3 फेब्रुवारी ला मला shoot ला सुट्टी होती म्हणून धावत पळत पुण्यात येऊन dr कडे गेले तेव्हा dr नी सांगितलं की आता operation शिवाय सोडणार च नाहीत, नाहीतर दुखणं धोकादायक होऊ शकते 4 तारखेला शूट असताना 3 ला operation कसं करणार???

शेवटी dr नी नियम बदलून 2 तारखेला रात्री operate करायचं ठरवलं. आणि ताबडतोब admit झाले. Operation व्यवस्थित पार पडले, 24 तासांनी, म्हणजे 3 तारखेला रात्री 9 वाजता discharge दिला. घरी आले, बॅग घेऊन शूटिंग साठी रवाना झाले. चाकण ला. पुढे सलग तीन दिवस काम करून आज् पुण्यात परतले. माझ्यात एवढी हिम्मत असेल असं माला ही वाटलं नव्हतं पण रंगदेवतेच्या आशीर्वादाने शूट व्यवस्थित पार पडले. या सर्व प्रसंगात माझ्या घराचे, मित्र परिवार, सहकलाकार आणि hospital चा सगळा स्टाफ , या सर्वानी माझी सोबत केली. काळजी घेतली. या सर्वांना “thank you” म्हणून मी त्या ऋणातून बाहेर पडणे कृतघ्न पणाचे ठरेल.

योगायोग असा की मी करत असलेल्या चित्रपटाचं नाव “विठ्ठल” अणि या सर्वांच्या रूपाने तोच माझी पाठराखण करत होता याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सर्वांनी मायेनी चौकशी केली, पण सगळ्यांना उत्तर देणे शक्य नव्हते. म्हणून हा पोस्ट प्रपंच. असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. तुमची अश्विनी. अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे

देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *