मुंबई : राज्यामध्ये सध्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं विधान पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी बीडच्या अंबाजोगाई येथे केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे, यावरून अनेक तर्क-वितर्क देखील लावले जात आहेत. दरम्यान, आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
Mahesh Babu: मोठी बातमी! सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन; पहाटे ४ वाजता घेतला अखेरचा श्वास
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ मोदी मला संपवू शकत नाहीत असा मुळात नव्हताच. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या हृदयात असेल तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे,” असे बोलत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे.
पंकजा मुंडेंचं वक्तव्य काय?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण चालू असून मोदींना तेच संपवायचे असून. त्याचा अर्थ असा नाही की, म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणीही संपवू शकतं नाही. मोदी सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुम्हा सर्वांच्या मनावर राज्य केले तर, असे विधान मुंडेंनी केल आहे.
Ambadas Danave: शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा – अंबादास दानवे