WhatsApp आणि इतर ॲप्सच्या सुविधा असताना देखील आपण सर्वजण ई-मेलचा जास्त वापर करतो. आपली काही कॉन्फिडेन्शियल माहिती असेल तर आपण ती ईमेलद्वारेच पाठवतो. पण नको ते ईमेल देखील आपल्याला सतत त्रास देत असतात. या ई-मेल्समुळे आपलं स्टोरेज फुल होतं. मागच्या वर्षीपासून गुगलने अनलिमिटेड स्पेस देणं बंद केल्यामुळे आता ईमेलचं ट्राफिक पूर्ण जाम होतय. नको असलेले सर्व ईमेल्स आता तुम्ही या टेक्निकसह एकाच वेळी डिलीट करू शकता. चला तर जाणून घेऊया याचं टेक्निक.
रेल्वेच्या भयाण अपघाताचे खरं कारण आलं समोर; वाचून तुमच्या अंगावर येईल काटा
“स्टोरेज फुल झालं आहे”. हल्ली सर्वांची हीच तक्रार असते. स्पॅम मेल्स, जीमेलवर रिमाइंडर मेल्स, कंपन्यांचे प्रोडक्ट्सच्या जाहिरातींचे मेल्स या सर्व नको त्या पसाऱ्यामुळे आपले जीमेल स्टोरेज फुल होतं. तर हे स्टोरेज रिकामं करण्यासाठी जाणून घेऊया काय आहेत त्या नवीन 5 टिप्स. ज्यामुळे तुम्ही तुमचं जीमेल क्लीन करू शकता. सर्वप्रथम जास्त एमबीच्या फाइल्स सिलेक्ट करा आणि ते डिलीट करून टाका. त्यामुळे तुमचे इनबॉक्स मध्ये बरीच जागा मोकळी होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला सर्च बारमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये जाऊन डिलीट करणाऱ्या फाईलचा आकार टाकावा लागेल. Gmail तुमच्या मेल्सला प्राथमिक सामाजिक आणि प्रचारात्मक रूपांमध्ये विभाजित करते. त्यातील सोशल आणि प्रमोशनल मेल्सचा बहुदा वापर होत नाही. त्यामुळे आपण ते एकाच वेळी डिलीट करू शकतो.
धक्कादायक घटना! मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी
तुम्हाला जर एकाच तारखेचे सर्व मेल्स डिलीट करायचे असतील तर थोडं जास्त काम करावे लागेल. आधी सर्च बारमध्ये जाऊन त्या तारखेचे सर्व मेल्स शोधून काढा. त्यानंतर ते सर्व डिलीट करा. बऱ्याच वेळा आपल्याला नको असलेले वाईट मेल येतात. त्यासाठी तुम्हाला मेलला ब्लॉक करावे लागेल आणि त्यानंतर उभ्या तीन रेषा आल्या की त्यावर क्लिक करा आणि स्टोरेज क्लीन करून घ्या. त्यानंतर ब्लॉक सेंडर या ऑप्शनवर क्लिक करा. जेणेकरून त्या सेंडर कडून तुम्हाला नंतर कोणतही मेल येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला नको असलेले मेल्स देखील तुम्ही ब्लॉक करू शकता.
जर तुम्हाला एकाच विषयाचा मेल डिलीट करायचा असेल तर तो विषय टाका आणि ते मेल्स डिलीट करून टाका. स्टोरेज वाढवण्याकरता प्रथमतः फोन किंवा लॅपटॉपमध्ये तुमचे जीमेल ओपन करा. नंतर तिथे सर्च बारमध्ये “Has attachment larger than 10M” असे टाईप करा. यामुळे तुम्हाला दहा एमबीपेक्षा जास्त असलेले मेल्स दिसतील आणि त्यामुळे तुम्ही ते सर्व एकत्र डिलीट करू शकता. सर्च बारमध्ये दहा एमबीपेक्षा मोठा आकडा टाका ज्यामुळे दहा एमबीपेक्षा जास्त स्पेस घेतलेले ई-मेल्स तुम्हाला सहज डिलीट करता येऊ शकतात. नंतर एम्प्टी ट्रॅश करून घ्या. त्यामुळे तुमचं स्टोरेज वाढेल.