ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन दिवसरात्र काबाडकष्ट कष्ट करत असतात. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत ते राबराबराबत असतात. या ऊसतोड मजुरांसोबत दिवसरात्र त्यांचे कुटुंब देखील कष्ट करत असते. या ऊसतोड कामगारांना ऊस तोडण्यापासून वेळच मिळत नाही. मात्र सध्या एक इंस्टाग्राम रील व्हायरल होत आहे ज्यामुळे ऊसतोड कामगारांमधलं एक कुटुंब खुप व्हायरल झालंय.
“…म्हणून आफताबने दाबला होता श्रद्धाचा गळा”; अखेर हत्येचे कारण झाले उघड
सोशल मीडिया अशी गोष्ट आहे ज्यामध्ये एखादा माणूस रातोरात फेमस होऊ शकतो. या जोडप्याबाबत देखील असच काही झालं आहे. ते दररोज आपले काम करतानाचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. मात्र त्यांचा सगळ्यात जास्त व्हिडीओ पाहिला गेला तो म्हणजे बैलगाडीत ऊस घेऊन जातानाचा व्हिडीओ. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवगेळ्या कमेंट देखील करत आहेत. अजून असेच भारी भारी व्हिडीओ बनवत जा असे प्रोत्साहन देखील मिळत आहे.
दौंड हत्याकांडाचे गूढ वाढले; पुरलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढले
ज्यावेळी ऊस तोडणीच्या कामातून थोडा वेळ मिळतो त्यावेळी हे जोडपं इंस्टाग्रामवर रील्स बनवतं. त्यांच्या एका व्हिडीओमुळे ते रातोरात स्टार झाले आहेत. त्यांच्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
ब्रेकिंग! अचानक तब्बेत बिघडल्याने अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल