ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन दिवसरात्र काबाडकष्ट कष्ट करत असतात. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत ते राबराबराबत असतात. या ऊसतोड मजुरांसोबत दिवसरात्र त्यांचे कुटुंब देखील कष्ट करत असते. या ऊसतोड कामगारांना ऊस तोडण्यापासून वेळच मिळत नाही. मात्र सध्या एक इंस्टाग्राम रील व्हायरल होत आहे ज्यामुळे ऊसतोड कामगारांमधलं एक कुटुंब चांगलाच फेमस झालं होत.
जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? ‘त्या’ एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
हे ऊसतोड दाम्पत्य रातोरात ते एवढे फेमस झाले की, अनेकांच्या स्टेटसला या दाम्पत्याचा व्हिडिओ झळकू लागले. मात्र त्यांची ही प्रसिद्धीचं त्यांचं संकट बनली असून त्यांचं इंस्टाग्रामवर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या इंस्टाग्रामवरून वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात प्रथमच महिला एसटी चालवणार! प्रशिक्षण आले अंतिम टप्प्यात
दरम्यान, सोशल मीडिया अशी गोष्ट आहे ज्यामध्ये एखादा माणूस रातोरात फेमस होऊ शकतो. या जोडप्याबाबत देखील असच काही झालं आहे. ते दररोज आपले काम करतानाचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. मात्र त्यांचा सगळ्यात जास्त व्हिडीओ पाहिला गेला तो म्हणजे बैलगाडीत ऊस घेऊन जातानाचा व्हिडीओ.
जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? ‘त्या’ एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ