Sugar factory: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू

Sugar factory: a relief for farmers! Sugar factory in 'Ya' district will start soon

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे.ऊस उत्पादक (Sugarcane growers)शेतकऱ्यांची आता चिंता मिटली आहे.गेल्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (farmers) ऊसाची तोड लवकर न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु त्यामुळे या वर्षी लवकर कारखाने (Sugar factory) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जळगाव (jalgav )जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच सुरू होणार असल्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

Sushma Aandhare: “आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा केवळ बालीश चाळे”, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची 106 वी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह संचालक यांची बैठकीला उपस्थिती होती. यावेळी जिल्हा बँकेशी संबंधित विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून बंद असलेले साखर कारखाने सुरु होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Anil Kapoor: “कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” प्रश्न विचारताच अनिल कपूर म्हणाले, “सेक्स, सेक्स, सेक्स.”

हे साखर कारखाने आहेत बंद

जळगाव जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. यात चोपडा साखर कारखाना, बेलगंगा साखर कारखाना, मधुकर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. हे साखर कारखाने भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याला विक्रीला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तो भाडेकरारावर देण्याबाबतचा प्रस्ताव आला असून त्यावर सुद्धा लवकरात लवकर निर्णय होईल.

Rohit Pawar: ” तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी…”, रोहित पवारांचा राज्य सरकारला गंभीर इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *