साखर उद्योगाला बुस्ट मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांना दिला विशेष कृती आराखडा

Sugar industry will get a boost, Chief Minister Eknath Shinde has given a special action plan to the farmers

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि या कृषीप्रधान देशाचा शेतकरी हा कणा असतात. याच शेतकरी राजासाठी राज्यातील सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहे. या योजनांमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मग यामध्ये भू-विकास बँकेच्या शेतकर्‍यांची कर्जमाफी असो, शेतकर्‍यांची नुकसान भरपाई (agriculture) असो, नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांचे तातडीने कर्ज मंजूर प्रकरणे असोत या सर्व बाबतीत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी करत आहे.

दूध उत्पादकांसाठी दिलासादायक! गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांनी वाढ

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक सहकारी साखर कारखानाच्या 2022-23 च्या गळीत हंगामाच्या प्रारंभाप्रसंगी उपस्थित होते. यावेळी ते बोलत असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या शाश्वत विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याची (lifestyle) महत्त्वपूर्ण माहिती दिली.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! 35 हजार शेतकऱ्यांचे तब्बल 964 कोटींची कर्ज माफ होणार, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्राचा साखर उद्योगात सर्वात मोठा वाटा

यांदाच्या हंगामात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सरासरी ऊस उत्पादन 95 टन प्रति हेक्टर अपेक्षित आहे. तसेच या हंगामात 203 कारखाने सुरू होऊन 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. दरम्यान येत्या काळात भारतातून 100 लाख मेट्रीक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा 60 लाख मेट्रीक टन राहण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे (lifestyle) यांनी व्यक्ती केली.

पुणे जिल्ह्यात परप्रांतीयाने फुलवली काळ्या उसाची सेंद्रीय पद्धतीने शेती, बाजारपेठेत ऊसाला विशेष मागणी

दरम्यान गेल्या वर्षी देशात 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा आहे. त्यापैकी 30 लाख मेट्रीक टन साखर (sugar Industry) एकट्या महाराष्ट्रात आहे. यंदा महाराष्ट्राने देशातील साखर उत्पादन्नात उत्तरप्रदेशपेक्षा आघाडी घेतली आहे.

साखर उद्योगाला बुस्ट मिळणार

विशेष म्हणजे राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. भविष्यात इथेनॉलवर धावणारी वाहनांची निर्मिती लक्षात घेऊन या इंधनामधील मर्यादा सातत्याने वाढविली जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांत तयार होणार्‍या इथेनॉलला मागणी वाढेल. दरम्यान त्यातूनच आता साखर उद्योगाला बुस्ट मिळण्याचा आशावादही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान अतिवृष्टी, सततच्या व परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ‘या’ तारखेला18 हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार

आमचे सरकार ‘वर्क फ्रॉम रोड’

मागील तीन महिन्यांपूर्वी शिंदे गटाने बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. दरम्यान यापुर्वीचे सरकार हे ‘वर्क फ्रॉम होम’ करत होते. त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांचे प्रश्न कळलेच नाहीत अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसच पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, “आम्हाला सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी समजतात. कारण आम्ही धडाडीचे अन् लोककल्याणाचे अनेक निर्णय घेत आहेत. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता वर्क फ्रॉम होमचे सरकार बदलले नसते तर सणोत्सवही झाले नसते, अशी जोरदार टीका केली.

Sanjay Datt: “मी आता साउथचे सिनेमे जास्त करणार”, संजय दत्तचं मोठं विधान, कारण आल समोर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *