Site icon e लोकहित | Marathi News

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणार ऊस परिषद, ऊस उत्पादकांचे राजू शेट्टींच्या घोषणेकडे लागले लक्ष

Sugarcane council of Swabhimani corporator, Sugarcane grower Raju Shetty will be announced today.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दरासाठी निर्णायक ठरणारी 21 वी ऊस परिषद होणार आहे. दुपारी एक वाजता या परिषदेला सुरुवात होणार असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत या परिषदेची सांगता होणार आहे. ही परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये होणार आहे. दरम्यान या परिषदेसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे पाऊस आला तरी ही परिषद होणार असल्याचे राजू शेट्टींनी (Raju Shetty) सांगितले.

मेडिक्लेम पॉलिसी करणं ठरलं गरजेचं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. दरम्यान महागाई वाढल्यामुळे उसाचा भाव वाढवा अशी त्यांची मागणी आहे. आता सध्याच्या परिस्थितीत भारताच्या साखरेची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे. इतकंच नाही तर इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. त्यामुळे यंदा ब्राझिलमध्ये उसाचे उत्पादन कमी झाले आहे. म्हणून पुढच्या वर्षी भारताच्या साखरेला जागतिक बाजारात मागणी चांगली असणार असून साखर उत्पादनात आता भारताचा पहिला नंबर लागतोय.

Urfi Javed : “आय लव्ह यू पारस ”, उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात?; समोर आले व्हिडिओ आणि फोटो

दरम्यान, आता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. त्याचबरोबर कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे शेट्टी म्हणाले. इतकंच नाही तर सध्या खतांचे तसेच मजुरीचे वाढलेले दर, साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपीची रक्कम अधिक मिळावी, अशी या परिषदेत आमची मागणी असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. यामुळे आता या ऊस परिषदेत राजू शेट्टी काय भूमिका मांडणार याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कारमध्ये सीटबेल्ट नसल्यास होणार कडक कारवाई; पोलिसांकडून निवेदन जाहीर

तसेच राजू शेट्टी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शेट्टी म्हणाले की, अजित पवार शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देण्याऱ्या, एकरकमी पैसे देण्याऱ्या कारखान्यांनाच ऊस द्या असा सल्ला देतात. पण तुम्ही उपमुख्यमंत्री असताना एकरकमी FRP चे दोन तुकडे करण्याचा कायदा विधानसभेत मंजूर करुन घेतला. यावेळी तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवले होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असा सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल शेट्टी यांनी केला.

“मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार..”, टाईमपास’फेम दगडूचे भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत वक्तव्य

Spread the love
Exit mobile version