शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर श्रीगोंदा तालुक्यात एक नंबर राहणार

Sugarcane rate of Shivajirao Nagwade Cooperative Sugar Factory will be number one in Srigonda taluka

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्यसरकारने नुकत्याच त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या राज्यातील बहुतेक कारख्यान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झालाय. यामध्येच चालू गळीत हंगामामध्ये सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर तालुक्यात एक नंबर राहणार असल्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! आज पुणे बंदची हाक; साडेसात हजार पोलीस बंदोबस्त

या कारखान्याने ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या एक लाख ७७ हजार मेट्रिक टनाचे पहिले पेमेंट दोन हजार तीनशे रूपये काढल्याची माहिती चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.

मुलींची छेड काढणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे २८४ लाख टन उसाचे गाळप होऊन २५२ लाख क्विंटल साखर उत्पादन ( Sugar Production) झाले आहे. यासाठी दररोज सरासरी आठ लाख टन क्षमतेने गाळप सुरू आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे.

राज्यात अवकाळी पाऊसाची शक्यता; हवामान खात्याकडून देण्यात आल्या ‘या’ सूचना

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *