मुंबई : सोमवारी (19सप्टेंबर रोजी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची बैठक (Meeting of the Committee of Ministers) झाली. या बैठकीत यंदाचा ऊस (sugar cane) गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा निर्णय घेण्याच कारण म्हणजे गेल्या हंगामात निर्माण झालेला अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि यंदा उसाचे वाढलेले क्षेत्र, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी साखर उत्पादनात (sugar production) महाराष्ट्र जगात तिसर्या स्थानी असल्याने या उद्योगाचे अभिनंदन केले. या बैठकीत यंदाच्या गळीत हंगामात 10.25 टक्के बेसिक उतार्यासाठी उसाला प्रतिटन 3,050 रुपये एफआरपी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.
दरम्यान या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरेमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,आ. प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, खा. धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील, आदी उपस्थित होते.
Lumpy: लम्पी रोगाचा राज्यात धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यात मनुष्यबळ कमी, तरी लसीकरणात अव्वल
यंदाच्या वर्षी गाळप होणार्या उसासाठी 10.25 टक्के बेसिक उतार्यासाठी प्रतिमेट्रिक टन 3,050 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेऊन शेतकर्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी 98 टक्के अदा करण्यात आली आहे. गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित आहे.यंदा देशातून 100 लाख मेट्रिक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रिक टन आहे.
राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. साखर उत्पादनात राज्याने उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले आहे. दरम्यान यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर झाली आहे तसेच यंदा सरासरी 95 टन प्रतिहेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार आहेत.138 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.