Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी घेतला टोकाचा निर्णय, छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर संपवलं जीवन

Maratha Reservation

Maratha Reservation । छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha community reservation) मुद्दा चांगलाच गाजला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्र मराठा समाजाने घेतला आहे. त्यात काही मराठा तरुण आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide for reservation) करत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न’ जाहीर

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ येथील विजय ‎पुंडलिक राकडे (वय 39 वर्ष) या मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तो सहभागी झाला होता. परंतु, आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत पडला होता. (Suicide for reservation in Chhatrapati Sambhajinagar)

VIDEO । तरुणीसह डान्स करणं होमगार्डच्या आलं अंगलट, घडलं असं काही की..

त्यामुळे त्याने बुधवारी विष घेतले. नातेवाईक आणि गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्याला तातडीने फुलंब्री येथे‎ रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तेथे त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला ‎छत्रपती‎ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ‎दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे मराठा‎ आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली आहे.

Maharashtra Employees Strike । मोठी बातमी! आजपासून राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर, नेमकं कारण काय?

Spread the love