मुलांनी मुलींना त्रास देणे काही नवीन नाही. आपल्या आजूबाजूला नेहमी अशा घटना घडतच असतात. दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) मध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले असल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे.
भर उन्हामध्ये झाली ढगफुटी? व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल; पाहा VIDEO
माहितीनुसार, नकुशा साऊ बोडेकर असे या तरुणीचे नाव आहे. नकुशाने आपल्या नातेवाईकांच्या घरी आत्महत्या केली असून सुसाईड नोट ( Sucide Note) लिहिल्याप्रमाणे, तिने त्रास देणाऱ्या तरुणाच्या भीतीनेच आत्महत्या केली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने त्रास देणाऱ्या तरुणाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा केली आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! अमृता फडणवीस फसवणूकप्रकरणी डिझायनर महिला पोलिसांच्या ताब्यात
काही दिवसांपूर्वी नकुशा आपल्या नातेवाईकांच्या घरी बोंद्रेनगरला गेली होती. यावेळी तिने कोणीही घरी नसताना छताला लटकून गळफास घेतला. नातेवाईकांनी घराची कडी तोडून दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान नकुशाला त्रास देणाऱ्या तरुणाला शिक्षा दिल्याशिवाय तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या घरच्यांनी घेतली आहे.
कृष्णापुर ते ढाणकी नाला रुंदीकरण व खोलीकरण प्रशासनाकडे वारंवार निवेदन करूनही अद्याप मंजूर केले नाही!