Site icon e लोकहित | Marathi News

Sujay Vikhe Patil । मोठी बातमी! सुजय विखे पाटील ‘या’ ठिकाणाहून निवडणूक लढविण्यास इच्छुक

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil । लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याविरुद्ध पराभव झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का बसला होता. त्या पराभवामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला मोठी नामुष्की अनुभवावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) तयारी सुरू केली आहे. राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी त्यांची विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छाशक्ती व्यक्त केली आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

Sharad Pawar । शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय; बड्या नेत्याचे धक्कादायक आरोप

सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधताना संगमनेरमध्ये (Sangamner) विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी टीका करताना म्हटलं की, “संगमनेरमध्ये जेसीबी देणं हे दूरच, आमच्या मागील आवर्तनात तर शेजारच्या आमदाराच्या एक हात वर असलेला फोटो फ्लेक्स बोर्डवर होता. दुसऱ्या आवर्तनात त्याचे दोन हात वर दाखवले. आता तिसऱ्या आवर्तनात काय होईल, हे पाहावं लागेल. धरणात जाऊन जलपूजन करतात, पण कामाच्या बाबतीत एकही जेसीबी देऊ शकत नाहीत.” सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या भाषणात असंही म्हटलं की, “आम्ही सातत्याने तुमच्यासोबत असतो आणि असंच राहणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच काम चालू करू, जरी पराभव झाला तरी लोकांचा विश्वास कायम ठेवा.”

Bjp । ब्रेकिंग! भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी, राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात

त्यांनी पुढे असेही म्हटलं की, “आमच्या मतदारसंघात जात किंवा धर्माच्या आधारावर काम होत नाही, फक्त माणूस म्हणून काम होतं. जात-धर्माच्या नावावर कुणी विष कालवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल.” विखे पाटील यांचा असा विश्वास आहे की, जनतेचे विकासाला महत्त्व असावे, अन्यथा राजकारणात प्रवेशाची त्यांची इच्छा नाही.

Ajit Pawar । अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडियावर बोलबाला; नवनवीन व्हिडिओ, आकर्षक प्रचार गाण्यांनी वाढवली रंगत

त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरून हा निष्कर्ष काढला की, चांगला माणूस हारला तर त्या भागातील पुढील दहा वर्षे आणि पुढील पिढी अंधारात जाते. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मेहनतीचा आणि कामाचा उल्लेख करत जनतेला आश्वस्त केले की, त्यांनी त्यांच्या परिवारावर कायम विश्वास ठेवावा.

Electric motorcycle । अल्ट्राव्हायोलेटने बजाजला दिलं धाडसी आव्हान; इलेक्ट्रिक मोटरसायकलिंगमधील नवीन स्पर्धा

Spread the love
Exit mobile version