Site icon e लोकहित | Marathi News

Sujay Vikhe Patil । नगरकरांसाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil । 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणार्‍या भगवान श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने या सोहळ्याची जोरदार तयारी केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून बड्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे देखील दिसत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच अहमदनगर शहरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

Crime । विद्यार्थिनीने होस्टेलच्या जेवणाची तक्रार केली, नंतर एकटीला रूममध्ये बोलावलं अन् अधिकाऱ्याने केलं भयानक कृत्य; घटना वाचून हादराल

या राम मंदिर सोहळ्यानिमित्त सुजय विखे पाटील यांच्या वतीने ‘मेरे घर आय श्रीराम’ ही योजना देखील आखण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील व्यक्ती 22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या घराची सुंदर सजावट देखावा तयार करून त्यांना दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवतील.

Karnatka News । हॉटेलच्या खोलीत 6 जण घुसले, आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला; फरफटत रस्त्यावर आणलं अन्…

व्हाट्सअपवर पाठवलेल्या देखाव्यातून पहिल्या तीन कुटुंबाची निवड होणार आहे. ही निवड स्वतः खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे करणार आहेत. यामध्ये पहिल्या तीन कुटुंबातील प्रत्येकी दोन व्यक्तींना खासदार सुजय विखे पाटील हे विमानातून अयोध्यातील प्रभू श्रीरामांचे दर्शन घडवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Viral News । धावत्या कारच्या खिडकीमध्ये अडकलं मुलाचं डोकं, झालं होत्याचं नव्हतं; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Spread the love
Exit mobile version